किरण सामंत यांची काळजी घेण्यासाठी महायुतीचे नेते सक्षम…

आमदार नीतेश राणेंचे स्पष्टीकरण:फडणवीस यांच्याकडे गेलेला माणूस हा परत येताना खाली हात कधीही जात नाही..

⚡कणकवली ता.१५-: किरण सामंत यांची कोणीही चिंता करू नये, त्यांची काळजी घेण्यासाठी महाययुतीचे सर्व नेते सक्षम अाहेत, असे अामदार नीतेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महायुतीचे सगळेच कार्यकर्ते आम्ही आपल्या आपल्या पद्धतीने प्रचार करत आहेत. शिवसेने ज्येष्ठ नेते तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार प्रमोद जठार असे सर्वच महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते महायुतीचा उमेदवार निवडून यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट व्हावे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मोदींच्या विचारांचा खासदार निवडून यावा. या दृष्टिकोनातून प्रचार केला जात अाहे. किरण सामंत यांची भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट झाली. फडणवीस यांच्याकडे गेलेला माणूस हा परत येताना खाली हात कधीही जात नाही. किरण सामंत हे राजकारणातील “लांबी रेस चे नेते आहेत.”.किरण सामंत यांची कोणीही चिंता करू नये, त्यांची काळजी घेण्यासाठी महायुतीचे सर्व नेते सक्षम आहेत, राणे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page