अशोक वारंग यांचा भाजपात प्रवेश…

⚡कणकवली ता.१५-: सावडाव येथील शिवसेना उबाठा गटाचे विद्यमान शाखाप्रमुख अशोक वारंग यांनी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. अामदार नीतेश राणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी वागदेचे सरपंच संदीप सावंत, सावडावचे उपसरपंच दत्ता काटे, संजय झगडे, अनंत जाधव, भाई आंबेरकर अादी भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. ठाकरे गटाकडून कोणतेही विकासकामे होत नसल्याने नीतेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे वारंग यांनी सांगितले. नीतेश राणे यांच्या माध्यमातून सावडाव गावामध्ये विकास कामे झाली. गावचा विकास नीतेशजी राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो, असा विश्वास त्यांना असल्यामुळे वारंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

You cannot copy content of this page