सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाची चार डंपरवर कारवाई…

विनापास, ओव्हरलोड वाहतूक केल्याने केली कारवाई

*💫सावंतवाडी दि.२४-:* येथील तहसील कार्यालयाच्या विशेष पथकाने आज बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या चार डंपरवर कारवाई केली असून, यामध्ये दोन वाळूचे डंपर तर दोन खडी पावडरच्या डंपर चा समावेश आहे. चारही डंपर जप्त करून येथील तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली आहे. येथील महसूल विभागाकडून अलीकडे ओव्हरलोड तसेच अनधिकृत वाहतूक करणाऱ्या डंपरवर धडक कारवाई सुरू असून गेल्या महिन्याभरात जवळपास दहा डंपरवर अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे पंधरा दिवसांपूर्वीच चिंचोली चेक पोस्ट येथे चार विनापास वाळूचा डंपर वर कारवाई करण्यात आली होती यातील एकदम पर तहसील कार्यालयातून चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सदर डंपर चालकांनी न्यायालयात आपली हजेरी लावली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा दिवसभरात विशेष पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे त्यामध्ये झाराप-पत्रादेवी बायपास महामार्गावर वाळूचे डंपर तर बांधा विलवडे परिसरांमध्ये कडे पावडर वाहतूक करणाऱ्या डंपर वर कारवाई करण्यात आली संबंधित डंपर चालकांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे तहसीलदार श्री म्हात्रे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page