घोटगे येथील जळालेला ट्रान्सफार्मर न बसविल्याने शेतकरी नाराज…

बागायतींना पाणी मिळत नसल्याने हाल;आंदोलन करण्याचे महादेव दळवी यांचा इशारा

*💫दोडामार्ग / सुमित दळवी* घोटगे येथील शेतकरी यांना पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन विधुत टान्सफार्मर बसवण्यात आला याची चाचणी घेत असताना तो जळून गेला पण तो अद्याप पर्यंत बसवला नाही त्यामुळे येथील केळी बागायती यांचे पाण्याअभावी नुकसान होत आहे.वीज महावितरण अधिकारी यांना माहिती देवून देखील तो बदलला नाही आठ दिवसांत विधुत टान्सफार्मर बसवला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा घोटगे येथील शेतकरी आत्माराम महादेव दळवी व इतरांनी दिला आहे. घोटगे येथील शेतकरी आत्माराम महादेव दळवी यांनी कृषी शेत पंप यासाठी मागणी करुन येळप‌ई येथील जमिनीत केळी लागवड केली शिवाय इतर उत्पादन करायला घेतले नवीन शेती पंप मंजूर झाला. विधुत पोल उभारण्यात आले.पण वरचेवर विज पोल पुरले ते दोन महिन्यांत कोसळून पडले.या नंतर पुन्हा पोल उभे केले. वीज महावितरण कर्मचारी येथील विधुत टान्सफार्मर चेक करत असताना तो जळाला पण तो बदलून नवीन बसवावा अशी मागणी करुन देखील तो बदलला नाही त्यामुळे पाणी पंप बंद झाला आहे.केळींना पाणी पुरवठा करता येत नाही. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. दोडामार्ग वीज महावितरण अधिकारी यांनी जळालेल्या विधुत टान्सफार्मर येथे नवीन विधुत टान्सफार्मर तसेच एबी स्वीच बसवावी आठ दिवसांत कामाला सुरुवात केली नाही तर आंदोलन करावे लागेल किंवा ग्राहक मंचाकडे तक्रार केली जाईल असे आत्माराम महादेव दळवी यांनी निवेदनात म्हटले आहे.

You cannot copy content of this page