⚡कणकवली ता.१४-: शिवडाव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश भालचंद्र वाळके ( ५२ रा. मूळ रा. सावंतवाडी, सध्या रा. शिवडाव-मांगरवाडी, मूळ रा. सावंतवाडी ) यांचे शनिवारी निधन झाले. राजेश वाळके हे काही निमित्त मुंबई गेले होते. तेथून येताना ते प्रवासामध्ये बेशुद्ध पडले. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले. त्याठिकाणी उपचारदारम्यान त्यांच्या मृत्यू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजेश वाळके यांनी एक उत्कृष्ट कला शिक्षक म्हणून नावलौकिक मिळवला होता. शिवडाव माध्यमिक विद्यालयामध्ये ते शिस्त प्रिय शिक्षक म्हणून ओळखले जायचे. चित्रकला, रांगोळी, सुवाच्च हस्ताक्षर अशा बाबतीत ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे. वाळके यांच्या निधनाने शिवडाव गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, पुतण्या, विवाहित दोन पुतणी, भावजय असा मोठा परिवार आहे.
शिवडाव हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेश वाळके यांचे निधन…
