रिक्वेस्ट माझ्या राशीत नाही,आणि कोणाची परवा करणार नाही ; नारायण राणेंनी घेतला राजन तेलींना समाचार, नाराजीवर भेटून बोलणार..
सावंतवाडी
वैयक्तिक स्वार्थासाठी कोणीही स्टेटस आणि ट्विट करून अपशकुन करू नये मी कोणाची परवा करणार नाही. मी कोणाची नाराजी बघत नाही पक्ष हिताला मी महत्त्व देतो असं असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज येथे स्पष्ट केले माजी आमदार राजन तेली यांच्या नाराजीच्या स्टेटस बाबत पत्रकारांनी त्यांना छेडले असता ते बोलत होते.
दरम्यान मला कोण चांगला कोण वाईट हे लागत नाही कोणीही अशा का रे वागू नये चे माझे स्पष्ट मत आहे तसेच मी कोणाला रिक्वेस्ट करणार नाही रिक्वेस्ट माझ्या राशीत नाही असा इशारा वजा ताकीदही राणे यांनी दिली.
