⚡बांदा ता.११-: बांदा शहरात आज रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवानी एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्यात.
बांद्याचे माजी उपसरपंच तथा भाजपचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांना माजी आमदार राजन तेली यांनी भेट देत शुभेच्छा दिल्यात. तसेच बांद्याचे माजी सरपंच अक्रम खान यांना विशाल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी भेट देत शुभेच्छा दिल्यात.
यावेळी चराठा उपसरपंच अमित परब, केतन आजगावकर, ओंकार पावसकर, तेजस माने, श्रेयस परब यांच्यासह सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच राजाराम सावंत, अक्रम खान, जावेद खतीब, हुसेन मकानदार, माजी सभापती शीतल राऊळ, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, माजी सरपंच दीपक सावंत, मकरंद तोरसकर, अभिषेक देऊलकर, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्यात.
रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव सलग ३० दिवस कडक उपवास करतात. यामध्ये लहान व शाळकरी मुलांचा देखील सहभाग असतो. उपवास संपल्यानंतर रमजान ईद घराघरात साजरी करण्यात येते.
बांदा शहरात रमजान ईद उत्साहात साजरी…
