कै. बाळकृष्ण जाधव कुटूंबाला विशाल परब यांच्याकडून आर्थिक मदत…

⚡दोडामार्ग ता.११-: दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी येथील होमगार्ड सेवेत असलेले बाळकृष्ण जाधव यांचे मार्च महिन्यात झाडावरून पडून दुःखद निधन झाले. आज भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी त्यांच्या घरी भेट देऊन कै. बाळकृष्ण यांच्या आईची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी विशाल परब यांनी त्यांना आर्थिक मदत देऊन यापुढे केव्हाही अडचण असली तर हाक मारा मी केव्हाही उपस्थित राहिन अशी ग्वाही दिली.

यावेळी त्यांच्या सोबत भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, पराशर सावंत, देवेंद्र शेटकर, विशाल चव्हाण, रोहन चव्हाण, प्रकाश गवस, रंगनाथ गवस, विशाल बोर्डेकर, तेजस माने, केतन आजगांवकर, अमित परब आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page