Headlines

कलमठमध्ये उद्या पुंडलिक मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा…

कणकवली ता.१०-: कलमठ-बाजारपेठ येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरातील श्री पुंडलिक मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा शुक्रवार 12 एप्रिलला आयोजित केला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.


सकाळी 8.30 विविध धार्मिक विधी, दुपारी वा. महाप्रसाद, सायंकाळी 5 वा. भजन, 7 वा. पं. सुरेश बापट व स्वप्नील गोरे यांचा शिष्य अर्थव पिसे यांची नाट्य, भक्ती, अभंगवाणी असलेली सदाबहार ‘स्वराजंली’ ही मैफल सादर होणार आहे. त्यांना संगीतसाथ चिन्मय सावंत, गिरीष कामत, अनिरुद्ध कामत देणार असून सूत्रसंचालन श्याम सावंत हे करणार आहे. तरी या सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री पुंडलिक मंदिर जीर्णोद्धार कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page