सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत मळगाव येथील शारदा विद्यालय शाळेचे उज्ज्वल यश…

३६ विद्यार्थी यशस्वी तर १२ विद्यार्थी ठरले मेडलधारक..

⚡सावंतवाडी : सहदेव राऊळ : सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालय या जिल्हा परिषद शाळेने उज्ज्वल यश संपादन केले. परीक्षेत ३६ विद्यार्थी यशस्वी झाले असून १२ विद्यार्थी मेडलधारक ठरले आहेत.
यात तेज दत्ताराम मळगावकर हिने गोल्ड मेडल पटकविले असून दशरथ पंढरीनाथ गावकर, ईश्वरी उमेश साटेलकर, काव्या अर्जुन राऊळ, ममता नारायण आसयेकर, गायत्री प्रवीण डोंगरे यांनी सिल्व्हर मेडल तर दुर्वा गोपाळ नार्वेकर, अनुष्का सूर्यकांत गावडे, सान्वी लक्ष्मण कुडव, शिवाजी रामदास नाईक, युगा सिध्देश तेंडोलकर, लावण्या अजित नाईक यांनी ब्राॅन्झ मेडल प्राप्त केले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विवेक नार्वेकर, सदस्य सिद्धेश तेंडोलकर, मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षिका अस्मिता गोवेकर, सीमा सावंत, गौरी डिचोलकर यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page