कलमठमध्ये उद्या स्वामी समर्थ जयंती उत्सव सोहळा…

⚡कणकवली ता.०८-: श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे कलमठ-सुतारवाडी येथे बुधवार 10 एप्रिलला श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव व पालखी परिक्रमा सोहळा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.


सकाळी 9 वा. अभिषेक, गुरुपूजन, 10.30 वा. सामुदायिक नामस्मरण व आरती, दुपारी 12.30 वा. महाप्रसाद, 2 वा. पारायण, सायंकाळी 6 वा. गुरुमाऊली महिला भजन मंडळ, कणकवली यांचे भजन, 7 वा. श्री गणेश मॉन्टेसरी प्ले स्कूल, कलमठच्या विद्यार्थ्यांची दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम, 7.30 वा. महाप्रसाद, 8 वा. पालखी परिक्रमा, नृत्य भजन, त्यानंतर श्री देवी भगवती भजन मंडळ, चिंदर-मालवण यांचे भजन होईल. तरी या सोहळ्यात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री समर्थ सेवा केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page