ओटव येथील वृद्धाची आत्महत्या…

⚡कणकवली ता.०७-: ओटव-गावठणवाडीतील वसंत गंगाराम गावकर (80) यांनी आजाराला कंटाळून राहत्या घराच्या पावळीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.


वसंत गावकर व त्यांचा मुलगा सूयर्यकांत गावकर हे शनिवारी रात्री घरात झोपले. सकाळी सूर्यकांत गावकर यांना जाग आली असता त्यांचे वडील घरात दिसून आले नाहीत.सूर्यकांत यांनी त्याचा शोध घेतला असता घराच्या मागील असलेल्या पावळीच्या लाकडी वाशाला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत ते आढळून आले. याबाबत पोलिसांत सूर्यकांत गावकर (36, ओटव – गावठणवाडी) यांनी खबर दिली आहे. त्यानुसार घटनेची नोंद करण्यात आली आहे. वसंत गावकर हे गेले काही दिवस घशाच्या कॅन्सरमुळे त्रस्त होते.

You cannot copy content of this page