नाणीज पीठ धाम पादुका दर्शन सोहळा उत्साहात पार…

देवगड (प्रतिनिधी)
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरु रामानंदचार्य दक्षिण नाणीज पीठ धाम( महाराष्ट्र) पादुका दर्शन सोहळा रविवार दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजले पासून डायमंड हॉटेलच्या मागे इंद्रप्रस्थ हॉल सातपायरी देवगड या ठिकाणी मोठ्या उत्साहात हजारो सेवा समिती सदस्य भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.या निमित्त सकाळी १० वाजले पासून देवगड मांजरेकर नाका ते इंद्रप्रस्थ हॉल या मार्गावर भव्य पादुका मिरवणूक सवाद्य रथातून आकर्षक चित्ररथ सहभाग सह काढण्यात आली .यात मालवण तालुका सेवा समिती वतिने शबरी राम दर्शन,वेंगुर्ले तालुका सेवा समिती ने हिरण्यकक्षप वध तसेच श्री संत गजानन महाराज,छत्रपती शिवाजी महाराज असे चित्ररथ ही सादर करण्यात आले.सेवा समिती महिला सदस्य डोकीवर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या भगवे,पांढरे पेहराव सदस्यांनी करून या भव्य मिरवणुकीत सहभाग घेतला होता.पादुका मिरवणूक समाप्ती नन्तर पादुका पूजन विधिवत गुरुजींच्या उपस्थितीत करण्यात आले.त्यानंतर सामाजिक उपक्रमाअंतर्गत बचतगटांना आंबा कलम वाटप,फवारणी पंप वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या पादुका पूजन दर्शन सोहळ्यास आम.नितेश राणे,माजी आम.अजित गोगटे,देवगड नगरपंचायत नगराध्यक्षा साक्षी प्रभू,उपनगराध्यक्ष मिताली सावंत,नगरसेविका व अन्य यांनी भेट देऊन दर्शन घेतले.या निमित्ताने मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन उदय रानभरे यांनी सन्मान केला. पादुका दर्शन सोहळा संपन्न होऊन ज.न.म.प्रवचनकार पंकज बिरादार यांचे प्रवचन दीक्षा उपासक याना जगद्गुरू श्री नरेंद्राचार्यजी यांनी ऑनलाइन प्रवचन दिले.त्यानंतर सांजआरती होऊन समाप्ती झाली.हे कार्यक्रम पार पडले स्व-स्वरूप संप्रदाय सिंधुदुर्ग जिल्हा यांच्यावतीने सर्व सदस्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
: फोटो- १) देवगड येथील पादुका मिरवणूक
२)पादुका पूजन सोहळ्यास उपस्थित सेवा समिती सदस्य ,भाविक
३)सामाजिक उपक्रमाअंतर्गत आंबा कलम,फवारणी यंत्र वाटप करताना मान्यवर
४)आम.नितेश राणे दर्शन घेताना

You cannot copy content of this page