रिल्स मालवणी स्पर्धेत मालवणच्या हापूस गँगची मोहोर…

⚡मालवण ता.०७-: मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांच्या जयंतीच्या निमित्ताने कुडाळच्या रिल्स मालवणीच्या वतीने घेण्यात आलेल्या दुसऱ्या मालवणी रिल्स स्पर्धेत मालवणच्या सिद्धेश चव्हाण आणि त्यांच्या हापूस गँगने बाजी मारत रिल्स मालवणीच्या स्मृती चिन्हावर आपली मोहर उमटविली . रिल्स मालवणीच्या वतीने हापूस गँगला स्मृती चिन्ह व हापूस आंब्याची पेटी प्रदान करण्यात आली. हा पुरस्कार हापूस गँगच्या वतीने ऋतू प्रफुल्ल देसाई याने स्वीकारला.

गतवर्षी पासून मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांच्या जयंतीच्या निमित्ताने कुडाळ येथे रिल्स मालवणी नावाची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरील ७८ हून अधिक रिल्सचा सहभाग होता . या स्पर्धेत मालवणच्या सिद्धेश चव्हाण आणि त्याच्या हापूस गँगने प्रथम क्रमांक पटकावला. दैनंदिन जीवनात मालवणी मुलुखात आज परप्रांतीयांबरोबर संवाद साधताना हिंदी, इंग्रजी भाषेचा केला जाणारा वापर यावर प्रकाशझोत टाकतानाच या मालवणी रिल्सचे लेखक, दिग्दर्शक आणि एडिटर सिद्धेश चव्हाण यांनी मालवणी बोली भाषेला समाजात मानाचे पान द्यायचे असेल तर मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांनी सातासमुद्रापार पोहोचवलेली मालवणी भाषा रोजच्या जीवनात वापरली गेली पाहिजे अशा आशयाचे रिल्स बनविले होते. अवघ्या दीड मिनिटात अत्यंत प्रभाविपणे दिग्दर्शीत केलेली आणि चित्रित करण्यात आलेली ही रिल्स स्पर्धेच्या परीक्षकांच्या तसेच रसिकांच्या पसंतीस उतरली.

या रिल्स मध्ये बंटी कांबळी, सिद्धेश चव्हाण, प्रणव चव्हाण, संकेत हसोळकर, नितेश जाधव, गोसावी सर, श्री. हसोळकर, लारा मयेकर, मकरंद मयेकर, रीना मराळ, शुभदा टिकम, अभय कदम, गोपी मालवणकर, श्री. मांजरेकर या कलावंतांचा समावेश होता. या रिल्सचे चित्रीकरण ऋतू देसाई याने तर ड्रोन चित्रीकरण लकी कांबळी तर मेकअप आर्टिस्ट म्हणून सिद्धेश देऊलकर याने काम केले होते. या रिल्सचे संगीत दिग्दर्शन सुधीर गोसावी, गायक ऍड. पलाश चव्हाण, हार्मोनियम मंगेश कदम, साईड रिदम श्रीकांत मालवणकर तर सहकार्य गणेश मेस्त्री, श्रीराज बादेकर यांचे लाभले.

You cannot copy content of this page