⚡कणकवली ता.०८-: समानवता ट्रस्टतर्फे लक्ष्मी विष्णू हॉल येथे महिलांसाठी आयोजित केलेल्या मोफत शिलाई मशीन प्रशिक्षणाचा 175 महिलांनी लाभ घेतला. हे प्रशिक्षणपूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी भारत सरकारच्या संयुक्त सचिव सुषमा तायशेटे, अरुण तायशेटे, सुरेश तळेकर, आदिती रथ, समानवता संस्थेचे सचिव कमलेश गोसावी आदी उपस्थित होते. ट्रस्टतर्फे सामाजिक कार्यात योगदान देणार्या डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. अनिल नेरुरकर, स्व. सुनील तळेकर ट्रस्ट सुरेश तळेकर, मधुसूदन साळसकर, नीलम राणे, रश्मी दाभोळकर यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत कविता गोसावी यांनी केले. सूत्रसंचालन श्याम सावंत यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.
कणकवलीतील शिलाई मशीन प्रशिक्षणाला प्रतिसाद…
