बांदा : प्रतिनिधी गोव्यातून पुण्याकडे होणार्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात बांदा पोलीसांनी आज सकाळी बांदा चेकपोस्टवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे तब्बल ५० लाख रुपयांचा दारुसाठा व ५ लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण सुमारे ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी टी. टी. कोळेकर, प्रथमेश पोवार यांनी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास केली. दारुसाठा मोजमाप करण्याचे काम सुरु असून मुद्देमाल आकडा अजूनही वाढण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली. गेल्या काही महिन्यातील पोलीसांनी केलेली ही मोठी दारु कारवाई आहे. या कारवाईत ६०० हून अधिक गोवा बनावटीचे विविध ब्रँडचे बॉक्स जप्त केले आहेत.
बांदा पोलीस चेकपोस्टवर बेकायदा ५० लाखांची पकडली…
