पाणी समस्येवरुन माजी नगरसेवक सुरेश भोगटे आक्रमक…

मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब ;पाणी प्रश्न तात्काळ दूर करण्याची केली मागणी

*💫सावंतवाडी दि.२४-:* सावंतवाडी शहरात गेली काही दिवस भेडसावत असलेल्या पाणी प्रश्नावरून आज माजी नगरसेवक सुरेश भोगटे हे आक्रमक झाले असून, त्यानी आज सावंतवाडी मुख्याधिकारी तसेच पाणी पुरवठा आधिकारी याची भेट घेऊन शहरात कमी प्रमाणात होणाऱ्या पाणी पुरवठ्यावरून जाब विचारला आहे.सद्य स्थितीत उन्हाळा सुरू असताना पाणी पुरवठा का होत नाही, टाकीतून येणारे पाणी कुठे गायब जाते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईप लाईन मध्ये कुठे काही प्रॉब्लेम असेल तर तो दूर करावा परंतु पाणी प्रश्न दूर करावा असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच शहरात दोन वेळ पाणी पुरवठा करण्यास शक्य नसेल तर निदान या दिवसात एक तास तरी चांगल्या प्रकारे पाणी पुरवठा करावा अशी मागणी त्यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी माजी नगरसेवक उमाकांत वारंग, माजी नगरसेवक अफरोज राजगुरू, माजी नगरसेवक विलास जाधव आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page