राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार भाजपा नेते नारायण राणे
*💫ओरोस दि.२३-:* ‘”राज्यात सध्या कुंपणच शेत खात आहे’, असे सांगत पुरावे देवूनही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेत नाहीत. सचिन वाझेवर कारवाई करीत नाही. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून यापूर्वी आपण राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची केलेली मागणी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करणार आहोत. बुधवारी आपण राज्यसभेत अधिवेशनाला उपस्थित राहून ही मागणी लावून धरणार आहोत, असे सांगितले. पडवे येथील मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खा राणे यानी सचिन वाझे प्रकरणाचा घटनाक्रम विषद केला. पूर्ण घटनाक्रम पाहता सचिन वाझे विरोधात भक्कम पुरावे आहे. वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यानी बदली प्रकरणात कोणी किती पैसे मागितले. कशासाठी व कोणासाठी मागितले. याचे रेकॉर्डिंग पुराव्यासहित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केले आहे. तरीही मुख्यमंत्री ठाकरे कारवाई करीत नाहीत, असे सांगत हे तीन पक्षांचे सरकार राज्याच्या भल्यासाठी सत्तेवर आले असताना राज्यातील गोरगरीब जनतेची लूट करीत आहे, असे सांगितले.
