सावंतवाडी पंचायत समितीची सभापती निवडीसाठी 1 एप्रिल रोजी….

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.23 :‍ सावंतवाडी पंचायत समिती सभापती यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठीच्या निवडीसाठी दिनांक 01 एप्रिल 2021 रोजी दुपारी 3.00 वाजता सावंतवाडी पंचायत समितीच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम कलम 75 नुसार पंचायत समिती सभापती पद भरणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष सभा आयोजित करणे आवश्यक असल्याने सभापती निवडणूक घेण्यासाठी 1 एप्रिल 2021 राजी दुपारी 3.00 वाजता विशेष सभा बालवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिली आहेत. या निवडणुकीसाठी पिठासन अधिकारी म्हणून तहसिलदार सावंतवाडी यांची नेमणुक करण्यात आली आहे. तसेच सावंतवाडी पंचायत समिती सभापती हे पद सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. सभापती पंचायत समिती यांचा कालावधी दिनांक 26 डिसेंबर 2019 पासून होणाऱ्या अडीच वर्षाच्या कालावधीमधील उर्वरीत कालावधीकरिता आहे.

You cannot copy content of this page