*कोणत्याही परिस्थितीत राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार नाही

*माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केला विश्वास*

*💫सावंतवाडी दि.२३-:* माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाविकास आघाडी सरकार कोसळवण्यासाठी प्रयत्नशील असून, कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार हे कोसळणार नाही. असा विश्वास त्यानी व्यक्त केला आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपला राज्यात ५० आमदार देखील निवडून आणण्यास कठीण जाणार असल्याने याच भीतीपोटी ते विविध षंडयत्र रचत असल्याचा आरोप सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे. ते आज सावंतवाडी येथे आयोजित विद्यार्थी मेळाव्यात बोलत होते.

You cannot copy content of this page