रोटरी क्लब सावंतवाडीच्यावतीने जागतिक हवामान दिन साजरा

*💫सावंतवाडी दि.२३-:* आज “जागतिक हवामान दिन” या निमित्याने पर्यावरणाला साथ म्हणून रोटरी क्लब, सावंतवाडीच्या वतीने रोटरी, इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्यांना तसेच सर्व नागरिकां आवाहन करण्यात आले होते की, प्रत्येकानी आपल्या घरी एक तरी “तुळशीचे” रोपटे लावावे. कारण वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार “तुळस” ही दिवसातले 20 तास ऑक्सिजन तर उर्वरित 4 तास कार्बन डायाॅक्साईड हवेत सोडते. भारतीय संस्कृती, परंपरा यांमध्ये तुळस महत्त्वाची मानली गेली आहे. तुळस मांगल्याचे, पावित्र्याचे प्रतीक आहे. तुळस लावणे हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे, अशी मान्यता आहे. तेवढेच वैज्ञानिक, शास्त्रीयदृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीनेही तुळस अत्यंत लाभदायक मानली गेली आहे. आयुर्वेदातही तुळशीला, तुळशीच्या पानांना आणि तुळशीच्या बियांना महत्त्व असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासाठी घराच्या आसपास तुळस लावा आणि सेल्फी काढून पाठवा असा संदेश देण्यात आला होता. त्याच प्रमाणे आजच्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या वाहनांचा वापर टाळून त्याऐवजी सायकल, चालत किवा सार्वजनिक वहातूक व्यवस्थेने आपले दैनंदिन व्यवहार करा असे आवाहन करण्यात आले होते. त्याला अनुसरुन काही रोटेरीयन्सनी चालत तर काहीनी सायकल किवा सार्वजनिक वहातूक व्यवस्थेचा वापर करुन हा जागतिक-हवामान-दिन साजरा केला. रोटरी अध्यक्ष-रो.डॉ.राजेश नवांगुळ आणि सचिव रो.दिलीप म्हापसेकर यानी नवे तुळशीचे रोपटे लाऊन हा दिवस साजरा केला.

You cannot copy content of this page