मालवण येथील त्या कुटुंबाची आमदार वैभव नाईक यांनी घेतली भेट..

आर्थिक मदत करत नुकसान भरपाई मिळवून देण्याचे दिले आश्वासन

*💫मालवण दि.२३-:* देवबाग येथे आग लागून घर संसार जळालेल्या झुजे फर्नांडिस कुटुंबियांची आमदार वैभव नाईक यांनी भेट घेत आर्थिक मदत केली. शॉर्ट सर्किटने घराला आग लागली होती. वीज कर्मचारी घटनेनंतर उपस्थित होते. तरीही वीज वितरण अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना घटनास्थळी आणून वस्तुस्थिती दाखवली जाईल. फर्नांडिस कुटुंबियांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार वैभव नाईक सांगितले. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, पंचायत समिती सदस्य मधुरा चोपडेकर, रमेश कद्रेकर, निलेश पणदुरकर, मकरंद चोपडेकर, निहिता गावकर, फिलसू फर्नांडिस आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page