जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांचे प्रतिपादन..
वैभववाडी प्रतिनिधी
शिक्षक भारती हा एक परिवार असून शिक्षक भारतीचे सर्व सहकारी श्रीमंत मनाचे असल्याने शिक्षक भारतीचा मोठा विस्तार झाला.आमची संघटना शिक्षका बरोबरच विद्यार्थ्यांसाठीही सातत्याने अनेक उपक्रम राबवत आहे, त्यामुळेच शिक्षक भारती ही सर्वसामान्य शिक्षकांना आपली वाटते,शिक्षकांचा जो विचार आहे तोच शिक्षक भारतीचा विचार असतो. शिक्षक भारतीची भूमिका ही सर्वसामान्य शिक्षकाची भूमिका असल्यामुळे जिल्ह्यात तसेच राज्यात शिक्षक भारतीचा एक वेगळा दरारा आहे.सातत्याने शिक्षणक्षेत्रात अन्यायकारक बदल होत असल्याने भविष्यात शिक्षकांनी जर संघटित राहिले नाही तर, शिक्षकांवर गुलामी आल्याशिवाय राहणार नाही अशी भिती त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.शिक्षकांची विचारधारा समाजवादी असावी हीच भूमिका ठेवून शिक्षक भारती काम करत आहे .वैभववाडी शिक्षक भारती टीमचे कार्य निश्चितच गौरवास्पद असल्याचे तसेच वैभववाडी तालुक्यातील शिक्षकांनी विचारांची संपत्ती जपली आहे असे गौरवोद्गार शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यानी वैभववाडी मेळावेत काढले.
यावेळी व्यासपीठावर तज्ञ संचालक तथा माजी सचिव सुरेश चौकेकर, विद्यमान सचिव समीर परब, कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर, संघटक आकाश पारकर, उपाध्यक्ष सुनील जाधव, जनार्दन शेळके, माध्यमिक शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी पतपेढीचे विद्यमान संचालक सत्यपाल लाडगावकर, सौ विद्या शिरसाट, माजी जिल्हा सल्लागार शंकर खडतरे, माजी उपाध्यक्ष डी.एस. पाटील, प्राचार्य तानाजी साळुंखे, जिल्हा प्रसिद्धी विभाग प्रमुख दत्तात्रय मारकड ,माजी महिला आघाडी प्रमुख श्रीम. मीना बोडके, माजी मुख्याध्यापक राजाराम बिडकर, डी.एस. पाटील (लोरे हायस्कूल),नाधवडे हाय. वरिष्ठ लिपिक पुरुषोत्तम कोकाटे, शिक्षक भारती वैभववाडी तालुकाध्यक्ष अविनाश कांबळे,सचिव तथा विद्यमान संचालक स्वप्निल पाटील आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी विविध पुरस्कारांचे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनी शिफा जमादार तसेच पुरस्कार विजेत्या सत्कारमुर्तीतर्फे मुख्याध्यापक दीपक घाटगे,माधवराव पवार विद्यालयाच्या श्रीम.मीना बोडके,नाधवडे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक डी.एस. पाटील, कोकिसरे हायस्कूलचे निवृत्त विज्ञान शिक्षक शंकर खडतरे,नेर्ले विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक राजाराम बिडकर ,नाधवडे विद्यालयाचे लिपिक पुरुषोत्तम कोकाटे , उंबर्डे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री.परब , आदींनी आपली मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव पाटील (करूळ हायस्कूल) यांनी ,प्रास्ताविक अविनाश कांबळे (तालुकाध्यक्ष शिक्षक भारती मुख्याध्यापक हेत हायस्कूल) यांनी तर आभारप्रदर्शन कोकीसरे हायस्कूलचे शिक्षक तथा तालुका सचिव स्वप्निल पाटील यांनी केले.
सदर मेळावा यशस्वी होण्यासाठी शिक्षक भारती वैभववाडी चे शिलेदार यांनी विशेष मेहनत घेतली.
यामध्ये दीपक घाटगे (उपाध्यक्ष), सचिन क्षीरसागर, धनाजी भोसले, रामचंद्र घावरे, शंकर वाघमोडे, नजरुद्दिन जमादार, वैभव पाटील, दीपा भरडकर, दिपाली शिंदे,संजयकुमार आडे ,नागेश पांचाळ , मिलिंद मेस्त्री, अजित डिग्रजे यांनी विशेष मेहनत घेतली.या मेळाव्याला वैभववाडी तालुकासह जिल्ह्यातील शिलेदार, विविध शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो
शिक्षक भारती वैभववाडी तालुका स्नेहमेळाव्याचे उद्घाटन करताना संजय वेतुरेकर,सुरेश चौकेकर,प्रशांत आडेलकर व अन्य मान्यवर
छाया
