जाणता राजा महानाट्याचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ…

वैभववाडी प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित जाणता राजा या महानाट्य प्रयोगाचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत नाधवडे येथे पार पडला. जाणता राजा महानाट्य पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक व इतिहास प्रेमींनी पहील्या दिवशी मोठी गर्दी केली. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली.या कार्यक्रमाचे नियोजन प्रशासनाच्या वतीने नियोजनबद्ध करण्यात आले आहे. या महानाट्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसून पूर्णतः मोफत आहे. दि. १९ व २० मार्च ला देखील जाणता राजा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.

वैभववाडी तालुक्यात पहिल्यांदाच जाणता राजा महानाट्य सादर होत आहे. तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांना विनामूल्य (मोफत) हे महानाटक पाहण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. नाधवडे महादेव मंदिर नजीकच्या भव्य पटांगणावर १९ व २० रोजी देखील सायंकाळी ६.३० वा. ते रात्री १० या वेळेत हे महानाट्य रसिक प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ११९३ वा जाणता राजा या महानाट्याचा प्रयोग याठिकाणी सादर होत आहे. जाणता राजा या नाटकामध्ये जवळपास १५० कलाकार सहभागी झाले आहेत. घोडे, उंट यांचा देखील या नाटकात समावेश आहे.

You cannot copy content of this page