प्रमोद जठारांमुळेच जिल्ह्यातील काजू बागेतदारांसाठी ३०० कोटी जाहीर…

काजू उत्पादक शेतकरी राजू पवार यांचे विलास सावंत यांना प्रत्युत्तर..

वैभववाडी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.रविद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळेच सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील काजु उत्पादक शेतक-यांना रु.300 कोटीचे अनुदान सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील काजु उत्पादक शेतक-यांना शासनाने जाहीर केले आहे.

माजी आमदार प्रमोद जठार यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाने हे अनुदान देण्यास शासन यशस्वी झाले. प्रमोद जठार यांनीच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नाम.श्री अजितदादा पवार यांना भेटून रु.200/-चा हमीभाव मिळण्यासाठी निवेदन दिले. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे पननमंत्री मा.नाम.अब्दुलजी सत्तार, नाम.रविद्र चव्हाण, आमदार श्री. नितेश राणे व माजी आमदार प्रमोद जठार यांनी काजु हमीभावाबद्दल मंत्रालयात बैठका घेऊन काजु उत्पादक शेतक-यांना अनुदान रुपाने मदत मिळवून दिली. विलास सावंत यांनी मोदी व फडणवीस जोपर्यंत सत्तेत आहेत तोपर्यंत शेतक-यांना न्याय मिळणार नाही असे वक्तव्य केले. त्याच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य मंत्री नाम.श्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यात येऊन काजु उत्पादक शेतक-यांना गुरवार दि.14/03/2024ला रु.300 कोटी रुपये अनुदान जाहिर केले हे श्री विलास सावंत यांना माहित नाही का? असं सवाल राजू पवार काजु उत्पादक शेतकरी वैभववाडी यांनी केला आहे.
आजपर्यंतचा काजु उत्पादक शेतक-यांना 300 कोटी इतका भरीव निधी कुठल्याही सरकरने दिलेला नाही. तो श्री. प्रमोद जठार यांनी मिळूवून दिला आहे. काजु बी ला 200 रु. हमीभाव मिळावा यासाठी शासनास्तरावर श्री प्रमोद जठार यांनीच पहिली मागणी केली. प्रमोद जठार मागणी करीत असताना श्री विलास सावंत यांना त्यावेळी काजुबददल जठारांना काही समजत नाही व त्यांनी शासनाकडे काजुबद्दल मागणी करु नये असे वक्तव्य का बरे केले नाही? आता अनुदान मिळाल्यावरच ते जठार साहेबांवर वैयक्तिक टिका का बरे करीत आहेत? श्री विलास सावंत हे अभ्यासू आहेत, यात शंका नाही पण अशा अभ्यासू व्यक्तीने अशोभनिय वक्तव्य करणे त्यांना शोभत नाही. आता जरी रु.200/- चा हमीभाव मिळाला नसला तरी पुढे माजी आमदार प्रमोद जठार हे रु.200/- चा हमीभाव मिळण्यासाठी प्रयत्नशील रहातील याबद्दल काजु उत्पादक शेतक-यांना पूर्ण विश्वास आहे.

You cannot copy content of this page