*💫वेंगुर्ला दि.२२-:* वेंगुर्ले पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब यांनी काँग्रेस पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. दरम्यान राजीनाम्यात त्यांनी आपल्या वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर वरिष्ठांनी या पदाची जबाबदारी सिद्धेश परब यांच्याकडे दिली होती.दरम्यान जिल्ह्यात युवक काँग्रेसची संघटना मजबूत करण्याचे काम त्यांनी अगदी धडाडीने केले होते.दरम्यान ४ फेब्रुवारी रोजी सिद्धेश परब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा युवक काँग्रेसचा भव्य मेळावा सत्यजित तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या सूचनेनुसार आयोजित केला होता.त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता.दरम्यान तालुक्यात उपसभापती म्हणून धडाडीने कार्यरत असणारे व जिल्ह्यात जिल्ह्यात युवक काँग्रेसची संघटना वाढीसाठी प्रयत्नशील असणारे पदाधिकारी सिद्धेश परब यांच्या राजीनाम्यामुळे जिल्ह्यात किती गटांचे राजकारण समीकरण आहे का? याबाबाबत सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, अशी सिद्धेश परब यांची इच्छा आहे का ? यादृष्टीने हा राजीनामा दिला आहे का ? आदी राजकीय चर्चा सुरू आहेत.दरम्यान सिद्धेश परब प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेतील,असे चर्चिले जात आहे.
सिद्धेश उर्फ भाई परब यांचा युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा…
