बांद्यात महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद…

कोकण कला व शिक्षण विकास संस्था व ग्रामपंचायत आयनोडे-हेवाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन: ९४ महिला सहभागी झाले..

⚡बांदा ता.१४-: कोकण कला व शिक्षण विकास संस्था व ग्रामपंचायत आयनोडे-हेवाळे त्यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदरच्या मेळाव्यात ९४ महिला सहभागी झाल्या.

यावेळी सरपंच साक्षी देसाई, उपसरपंच समीर देसाई, ग्रामसेवक संदीप पाटील, ऍड. सोनू गवस, उमेदचे प्रकल्प समन्वयक श्री भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम दीपप्रज्वलन करून मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

सदरच्या महिला मेळाव्यामध्ये पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, उखाण्यांची स्पर्धा, व इतर कलागुणांना वाव मिळतील असे खेळ घेण्यात आले. त्याचबरोबर संध्याकाळच्या सत्रात ऍड. सोनू गवस यांचे मार्गदर्शन पर व्याख्यान झाले. ऍड. गवस यांनी पुराण काळापासून शिवछत्रपतींच्या काळापर्यंत आजतगायत देश आणि समाज घडवण्यासाठी महिलांनी केलेले कार्य आणि महिलांची ओळख तसेच महिला संरक्षणाविषयी कायदे सुव्यवस्था याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
   खेळात सहभागी होऊन विजयी झालेल्या महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे पदाधिकारी हनुमंत गवस यांनी केले. सरपंच साक्षी देसाई यांनी आभार मानले.
You cannot copy content of this page