⚡बांदा ता.१४-: वाफोली टेम्बवाडी व हरिजनवाडी येथील दोन्ही रस्ता कामाच्या डांबरीकरणाचा शुभारंभ माजी सभापती तथा भाजपचे नेते प्रमोद कामत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाले.
दोन्ही रस्त्यांसाठी प्रत्येकी ५ लाख असा एकूण १० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी सरपंच उमेश शिरोडकर, मधुकर देसाई, प्रविण देसाई, उपसरपंच विनेश गवस, देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस, माजी सरपंच मारुती गवस, बबन गवस, सोसायटी चेअरमन सौ. धनश्री गवस, व्हा चेअरमन अनिल गवस, भगवान गवस, भिवा गवस, चंद्रकात आईर, ग्रामसेवक प्रसाद ठाकूर, मंजुळा शेगडे, साक्षी शिरोडकर, रजंन गवस, राजेंद्र गवस, जयदेव गवस, समिर शिरोडकर, सुनिल कळगुंटकर, ग्रामपंचायन कर्मचारी संदिप धुरी, मंगेश गवस, लवू कांबळे, प्रभाकर गवस, ओंकार गवस, सखाराम आरोंदेकर, सुधिर गवस, अर्जुन गवस, देवीदास सावळ, सखाराम गवस, मनोहर गवस, किरण सावंत, बाबुराव गवस, सुरेश कांबळे, नंदकिशोर कांबळे, कृष्णा कांबळे, मोहन कांबळे, संजय कांबळे आदी उपस्थित होते.
दोन्ही रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार असल्याने स्थानिकातून समाधान व्यक्त होत आहे.
वाफोली टेम्बवाडी व हरिजनवाडी येथील दोन्ही रस्ता कामाचे प्रमोद कामत यांच्या हस्ते शुभारंभ…
