खास. विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी विजय संकल्प अभिषेक…

सतीश सावंत यांची माहिती:महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहाण्याचे केले आवाहन..

⚡कणकवली ता.१४-:
येत्या लोकसभा निवडणुकीत खास. विनायक राऊत बहुमताने विजयी व्हावे यासाठी महाविकास आघाडी करून त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठीकठिकाणी विजय संकल्प अभिषेक करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी सहा वाजता ओरोस येथील कराळे हॉलमध्ये खास. विनायक राऊत यांच्या अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी दिली.
येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी आम. वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शैलेश भोगले, सचिन आचरेकर उपस्थित होते. सतीश सावंत म्हणाले, खास. विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोकाभिमुख काम केले आहे.

त्यामुळे राऊत यांची सर्वसामान्यांचे खासदार म्हणून ओळख आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समितीच्या विभागातील गावांमधील गणपती व शंकराच्या मंदिरांमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून शुक्रवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत विजय संकल्प अभिषेक करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी होणाऱ्या अभिष्टचिंतन व स्नेहमेळावा कार्यक्रमास महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री. सावंत यांनी केले.

आम. वैभव नाईक म्हणाले, खास. विनायक राऊत यांच्या वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने ठिकठिकाणी अभिषेक, रक्तदान शिबिरे, महिलांसाठी पैठणीचा खेळ, विविध सन्मान सोहळे अशा पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page