लक्ष्मीबाई हळबे महाविद्यालयात माजी सुभेदार वसंत मिर्लेकर यांचे व्याख्यान..
⚡दोडामार्ग ता.१४-:
येथील लक्ष्मीबाई हळबे हळबे महाविद्यालयात बुधवारी (ता.१३ ) “भारतीय सैन्य कार्य आणि व्यवस्थापन” या विषयावर सेवानिवृत्त सुभेदार,मेजर वसंत मिर्लेकर यांनी व्याख्यान दिले
एन. सी. सी. विभागामार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी एन. सी. सी. कॅडेटना विविध रँक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात भारतीय सैन्य कार्य आणि व्यवस्थापन प्रणालीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्याना भारतीय सैन्य कार्य व सैनिकी प्रशासनाची माहिती तसेच सैन्य भरतीसाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रता याबाबत विद्यार्थ्याना माहिती मिळावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष सावंत आणि प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राजेंद्र केरकर उपस्थित होते.
महाविद्यालयात दरवर्षी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एन. सी. सी. कॅडेटची निवड करून त्यांना रँक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येतो. त्याचबरोबर कॅडेटना त्यांच्या भावी सैनिकी करिअर बाबत मार्गदर्शन मिळावे म्हणून सैनिकी विषयावरील व्याख्याने आयोजित केली जातात . या कार्यक्रमात सी.पी.एल., सार्जंट, ज्यू. अंडर ऑफिसर, सिनियर.अंडर ऑफिसर अश्या विविध, रँक देऊन कॅसेट्स चा सन्मान करण्यात आला. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राजेंद्र केरकर सर यांनी विद्यार्थ्याना दोडामार्ग तालुक्यातील विविध देवराई बाबतची माहिती दिली व आपल्या गावातील अश्या विविध देवराईवर विद्यार्थ्यांनी संशोधन करावे असे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सावंत यांनीही मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात एन.सी. सी. विभाग प्रमुख लेफ्ट.डॉ.प्रशांत ढेपे यांनी प्रास्ताविक केले.तर सूत्रसंचालन कॅडेट पुष्पा गावडे यांनी केले. कॅडेट ऋथिका गवस यांनी आभार मानले.
