कुडासे भरपाल येथे १९, २० मार्च रोजी ज्ञान कर्म भक्ती आणि मुक्ती संस्थेचा सत्संग सोहळा

⚡दोडामार्ग ता.१३-: ज्ञान कर्म शक्ती आणि मुक्ती संस्था (महा. रं. न. एफ १७९८) यांच्या वतीने परम संतांच्या वाणीवर आध्यात्मिक सत्संग सोहळा – भंडारा कार्यक्रम येत्या १९ आणि २० मार्च २०२४ रोजी कुडासे भरपाल (ता. दोडामार्ग, जिल्हा : सिंधुदुर्ग) संस्थेच्या मठामध्ये आयोजित केला आहे. मंगळवार, १९ मार्च रोजी सकाळी १० ते ११ : भक्तिगीते व भजने, सकाळी ११ ते दु. १२.३० संतवाणी प्रवचन, दुपारी १२.३० ते दुपारी १ संतदर्शन व कृपाप्रसाद, दुपारी १.३० ते दुपारी २.३० महाप्रसाद होईल. तसेच बुधवार, २० मार्च रोजी सकाळी १० ते ११ भक्तिगीते व भजने, सकाळी ११ ते दुपारी १२.३० श्री संत सद्गुरू आनंदी गुरुजींच्या दिव्य वाणीतून परम संतांच्या वाणीवर अध्यात्मिक प्रवचन, दुपारी १२.३० ते दुपारी १ संतदर्शन व कृपाप्रसाद, दुपारी १ ते २.३० महाप्रसाद होईल. या सोहळ्याचा सर्व सदभक्तांनी संत दर्शन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी बाहेरगावाहून येणारे सदभक्त आणि साधक यांची निवासाची सोय हॉलवर करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page