*💫बांदा दि.२२-:* बांदा-देऊळवाडी वडेर तिठा येथिल छत्रपती संभाजी राजे चौकातील श्री देव महापुरुष देवस्थानात वार्षिक श्री सत्यनारायण महापुजेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. श्री देव महापुरुष मंडळाच्या वतीने यावर्षी कोरोनाबाबत शासकिय नियमांचे पालन करत मर्यादित स्वरुपात हा कार्यक्रम करण्यात आला. ब्राम्हणवृंदाच्या उपस्थितीत श्री देव महापुरुष अश्वत्थ नारायणाची पुजा अर्चा करण्यात आली. तसेच श्री सत्यनारायण महापुजा करण्यात आली. पुरोहित प्रमोद वडेर यांच्या मार्गदर्शनाखाली यजमान दत्ताराम सावंत यांनी सपत्नीक पुजन केले. त्यानंतर आरती होऊन तीर्थप्रसाद वाटप करण्यात आले. मंडळाचे कार्यकर्ते तसेच परिसरातील व्यापारी वर्ग व ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
बांदा श्री महापुरुष मंडळाची वार्षिक पूजा उत्साहात…
