इन्सुलीतील तिलारी कालव्याच्या पाईपलाइनचे काम थांबवा…

अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ग्रामस्थ आक्रमक : पंधरा वर्षात पाण्याचा एक थेंबही नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप

*💫बांदा दि.२२-:* तिलारी कालव्याच्या कामाला पंधरा वर्षे होत आली असून अद्याप इन्सुलीत पाणी न आल्याने इन्सुली ग्रामस्थ आक्रमक झाले. गेली पंधरा वर्षे तुम्ही काम करत असून सुद्धा अजून एक थेंब पाणी तुम्ही आणू शकत नाही ही बाब दुर्दैवी आहे. सध्या गावात सुरु असलेले पाईपलाइनचे काम तात्काळ बंद करा. ज्यावेळी मुख्य कालव्यात पाणी येईल तेव्हाच इतर कामे करा, असे लेखी पत्र सरपंच तात्या वेंगुर्लेकर यांनी सहाय्यक अभियंता मुदगल यांना दिले. तसेच जर पाणी यायच्या अगोदर काम करताना दिसाल तर आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा, सरपंच तात्या वेंगुर्लेकर यांनी अधिकाऱ्यांना दिला. यावेळी सरपंच तात्या वेंगुर्लेकर, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा सावंत, स्वागत नाटेकर, वर्षा सावंत, मराठा समाज अध्यक्ष नितीन राऊळ, औदुबर पालव, आनंद राणे, दिलीप पेडणेकर, मनोहर गावकर, कृष्णा परब यांनी तिलारी कालव्याबाबतचे प्रश्न मांडले. स्वागत नाटेकर यांनी कालव्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना उद्भवत असलेल्या समस्या निदर्शनास आणून दिल्या व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कसे टाळता येईल हे पहावे यावेळी याबाबतचे निवेदन उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, सहाय्यक अभियंता मुदगल यांनी तात्काळ पाईपलाईनच्या ठेकेदारांना काम बंद करण्याचा सूचना दिल्या. तर इतर बाबीची तात्काळ पूर्तता करण्याबाबत कार्यवाही करू असे आश्वासन ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासनास दिले.

You cannot copy content of this page