⚡मालवण ता.१३-: इंडेन गॅस ग्राहकांनी ई केवायसी करणे गरजेचे आणि बंधनकारक आहे. मात्र यासाठी गावातील गॅस धारकांना मालवण येथे यावे लागणार असल्याने परंतु गॅस ग्राहकांचा वेळ आणि पैशाची बचत व्हावी या दृष्टीने सिंधू सहकारी इंडेन गॅस, मालवण आणि आंबेरी सरपंच यांनी केलेल्या मागणी नुसार आंबेरी ग्रामपंचायत येथे शुक्रवार दि. १५ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजल्या पासून ई – केवायसी साठी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात ई केवायसी करण्यासाठी इंडेन गॅसचे व्यवस्थापक सदानंद मयेकर हे उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात स्वतः गॅस ग्राहकाने आधारकार्ड झेरॉक्स आणि बँक खाते झेरॉक्ससह उपस्थित राहावे, तरी आंबेरी गावातील सर्व गॅस ग्राहकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
