⚡बांदा ता.१३-: रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ बांदा व रोटरी क्लब ऑफ बांदा तसेच सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १५ मार्च रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं. १ याठिकाणी ठीक १०.३० वाजता हे शिबीर सुरू होईल. यावेळी बांबूळी येथील ब्लड बँक रक्तसंकलन करणार आहे.
तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य करण्याचे आवाहन रोटरॅक्टचे अध्यक्ष अक्षय मयेकर, रोटरीचे अध्यक्ष प्रमोद कामत व सिंधुरक्तमित्रचे बांदा सदस्य निलेश मोरजकर यांनी केले आहे.
बांद्यात १५ रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन…
