देवबाग हायस्कुलला तीन लॅपटॉप प्रदान…

⚡मालवण ता.१३-: गड संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेकडून CSR उपक्रमांतर्गत मॉर्निंग स्टार कंपनीच्या साहाय्याने सिंधुदुर्ग मधील ३० शाळांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले असून यामध्ये दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे देवबाग येथील अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचालित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल या प्रशालेला ३ लॅपटॉप प्रदान करण्यात आले.

दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. संतोष हासुरकर यांच्यामार्फत रामगड हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात देवबाग हायस्कुलला ३ लॅपटॉप प्रदान करण्यात आले. लॅपटॉप प्रदान केल्याबद्दल अखिल देवबाग विकास मंडळ कनी देवबाग हायस्कुलतर्फे दुर्गवीर प्रतिष्ठानचे आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page