विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी येथे राज्यस्तरीय संस्कृती टेकनो कल्चरल फेस्ट…

⚡कणकवली ता.०८-: युवक कल्याण संघ, कणकवली संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी , शिरवल – कणकवली महाविद्यालयात राज्यस्तरीय संस्कृति टेकनो- कल्चरल फेस्ट व स्नेहसंमेलन २०२४ चे आयोजन करण्यात आले होते.


सदर कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव डॉ. रमण बाणे, खजिनदार मंदार सावंत,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदित्य अरविंदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयीन शिक्षणबरोबरच स्पर्धात्मक युगात दैनंदिन जीवनात स्पर्धेचे स्थान महत्वाचे कसे आहे याचे प्रतिपादन संस्थेचे सचिव डॉ. रमण बाणे यांनी केले. तसेच अशा प्रकारच्या स्पर्धेत कसे टिकून राहावे याची शिकवण शिकता शिकता यावी आणि अशा विविध स्पर्धेचे आयोजन सदर महाविद्यलयात जास्तीत जास्त प्रमाणात करू अशा प्रकारचे आश्वासन संस्थेचे खजिनदार मंदार सावंत यांनी व्यक्त केले. टेकनोलॉजी व स्पर्धात्मक युगात कसे वागावे,टिकावे, यासाठी कोणत्या प्रकारची कौशल्ये असावीत. तसेच सदर टेकनो-कल्चरल फेस्ट २०२४ मध्ये कोणत्या कोणत्या स्पर्धा आहेत.त्याचे नियोजन बाबत विविध प्रकारचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदित्य अरविंदेकर यांनी केले.
सदर कार्यक्रमात पोस्टर प्रेझेंटेशन, ओरल प्रेझेंटेशन, क्विज कॉम्पीटेशन, ग्रुप डांस कॉम्पीटेशन, सिंगिग कॉम्पीटेशन अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यभरातून फार्मसी महाविद्यालयाच्या सुमारे २०० हून अधिक विद्यार्थ्यानी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. तसेच त्यांच्या सोबत संबंधित महाविद्यालयाचे शिक्षकही या स्पर्धेसाठी सहभागी झाले होते.
यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थ्याना संस्थेचे अध्यक्ष आम. वैभव नाईक, उपाध्यक्ष सौ. स्नेहा नाईक,सचिव डॉ. रमण बाणे, खजिनदार मंदार सावंत, प्राचार्य डॉ. आदित्य अरविंदेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य चंद्रशेखर बाबर, बी फार्मसी प्रमुख अमर कुलकर्णी, विद्यार्थी प्रतिनिधि यश मिसाळ, विद्यार्थिनी प्रतिनिधि अपूर्वा कामत, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page