इच्छुक असलो तरी पक्षाचा आदेश पाळेल…

किरण सामंत: सावंतवाडी मतदार संघाच्या वतीने दीपक केसरकर यांनी केले जंगी स्वागत..

⚡सावंतवाडी ता.०८-: मी जरी लोकसभा निवडणुकीला इच्छुक असलो तरी पक्ष दिल त्याचं मी काम करेल अशी प्रतिक्रिया सिंधू रत्न योजनेचे अध्यक्ष किरण उर्फ भैया सामंत यांनी आज येथे दिली. दरम्यान किरण सामंतआज हे सावंतवाडी दौऱ्यावर आले असताना यावेळी त्यांचे मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जंगी स्वागत केले.

श्री सामंत आज सावंतवाडी येथे भंडारी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेनिमित्त आले होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढून भंडारी समाजाच्या बाईक रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान आज महिला दिनाच्या अवचित्यसाधन श्री सामंत यांनी महिलांना देखील शुभेच्छा दिल्या यावी महिलांचे देखील लक्षणीय उपस्थित होती.

यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी रुपेश पावसकर, गजा नाटेकर, गुणाजी गावडे, योगेश नाईक, विनायक सावंत, महिला जिल्हाप्रमुख एडवोकेट नीता सावंत अनोरजिन लोबो, शुभांगी सुकी, भारती मोरे, राजन पोकळे, प्रेमानंद देसाई, प्रसाद अरविंदेकर, सुधीर आडीवरेकर, जगदीश मांजरेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page