मंत्री भुजबळ यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात अध्यक्ष अबिद नाईक यांच्याकडून कारचे सारथ्य…

⚡कुडाळ ता.०७-: जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सिंधुदुर्गच्या भव्य वस्तूचा उद्घाटन सोहळा अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गुरुवारी पार पडला. यावेळी नामफलकाचे अनावरण व फीत कापून इमारतीचे उद्घाटन करण्यात झाले.
यावेळी नामदार छगन भुजबळ यांचे गोवा मोपा विमानतळावर आगमन दुपारी ३ च्या सुमारास झाले.

यावेळी मंत्री भुजबळ यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी मंत्री भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कार्याध्यक्ष काका कुडाळकर उपस्थित होते. मंत्री छगन भुजबळ यांच्या ओरोस कार्यक्रम स्थळापर्यंत कारचे सारथ्य अध्यक्ष अबिद नाईक यांनी केले.

You cannot copy content of this page