कर्जमाफी, नुकसानी पासून वंचित शेतकरी लोकसभेत बजावणार नोटा…

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत दिला इशारा..

सिंधुदुर्गनगरी ता ७
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खावटी कर्जमाफीचा लाभ मिळावा ,सन २०१७ च्या यादितील शेतकऱ्यांना सन्मान योजनेचा लाभ मिळावा. थ्रिप्स रोगामुळे व कोळे रोगामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी. या मागणीकड़े आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले. तर मागण्या मान्य न झाल्यास आगामी निवडणुकामध्ये “नोटा” हे बटन दाबून मतदानाचा हक्क बजावणार असल्याचा इशारा दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू पीक घेणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही. शासनाकडून केवळ कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. निवडणूका आल्या की कर्जमाफीची जाहीर करून गेली १० वर्षे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे .त्यामुळे शेतकऱ्यांचा आता शासनाच्या घोषणावर विस्वास राहिलेला नाही . कायम फसवनुकच होणार असेल तर जिल्ह्यातील शेतकरी आता कोणीही योग्य नसल्याचा दाखला देण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत “नोटा” बटन दाबून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तसा निर्णय झाला असून यासाठी निवडणूक कालावधीत सर्व शेतकरी आपल्या गावात प्रयत्न करणार आहेत. याची दखल शासनाने घ्यावी व शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीची तात्काळ कार्यवाही करावी . याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यानी आज पुन्हा जिल्हाधिकारी याना निवेदन देऊन लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे.

सन २०१७ च्या यादीतील ३०७७ शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अद्याप कर्जमाफी न मिळालेल्या उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत अनेकवेळा आंदोलने केली, उपोषण केले तरी याबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही .
तसेच २ लाख वरील कर्जदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दयावी . रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्या ना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा निर्णय झाला त्या प्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्या ना लाभ द्यावा. अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी जिल्हा शेतकरी संघटक श्यामसुंदर राय, प्रकाश वारंग, आग्नेल फर्नांडिस, अर्जुन नाईक, रामकृष्ण चिचकर , सुरेश गावकर, महेश चव्हाण,सुधीर परब, लाडू परब, कृष्णा तुळसकर,अमोल सावंत , संतोष पेडणेकर , संदीप देसाई आदीं शेतकरी उपस्थित होते.

You cannot copy content of this page