⚡बांदा ता.०७-: रोणापाल श्री देवी माऊली मंदिर येथे दि. 8 मार्च रोजी महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्री देव लिंग महादेव मंदिरात भाविकांकडून महादेवाला अभिषेक होणार आहे. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होतील. तसेच संध्याकाळी 7 वा. बुवा महेश मालप व बुवा मंगेश पाटणकर यांच्यामध्ये डबलबारी भजनांचा जंगी सामना होणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ, रोणापाल यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
रोणापाल येथे उद्या डबलबारी भजन…
