सुरेश भोगटे: वीज वितरणकडे केली निवेदनद्वारे मागणी..
⚡सावंतवाडी ता.०७-: शहराचे चितारआळीतील परिसरात उभाबाजार कडे जाणाऱ्या रस्त्यावर जिल्हा परिषद शाळेसमोर धोकादायक स्थितीत असलेला लोखंडी विद्युतखांब तात्काळ बदला अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी वीज वितरणकडे निवेदनद्वारे केली.
दरम्यान शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जीर्ण झालेले विद्युत खांब धोकादायक स्थितीत आहेत अशा प्रकारे एक खांब उभा बाजार परिसरात जाणाऱ्या रस्त्यावर जिल्हा परिषद शाळा नंबर एकच्या समोर आहे.
