गोव्यात नोकरी निमित्त जाणाऱ्यांचा अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढले…

मंत्री केसरकरांकडून मात्र रोजगाराचे गाजर दाखवून फसवनुक:बबन साळगावकर यांची वीस लाख रुपये मदत देण्याची मागणी

⚡सावंतवाडी ता.०७:- नोकरीनिमित्त गोव्यामध्ये जाणाऱ्या तरुण-तरुणी अपघातामध्ये मृत्युमुखी पडत असताना देखील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे तरुणांच्या रोजगाराबाबत गाजर दाखवून का फसवणूक करत आहेत ? असा सवाल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे उपस्थित केला.

दरम्यान मागील वीस वर्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोव्यामध्ये नोकरीच्या निमित्ताने जाता येता अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुण-तरुणींना महाराष्ट्र शासनाने त्वरित वीस लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी देखील यावेळी श्री.. साळगावकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page