जि.प. शाळा व अंगणवाडीतील बालकांना खाऊचे वितरण; शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांची उपस्थिती..
⚡सावंतवाडी ता.२१-: महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजगाव येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यानिमित्त जिल्हा परिषद शाळा क्र. १ तसेच गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सभापती अशोक दळवी, शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय माजगांवकर, ग्रामपंचायत सदस्य बाळा वेजरे, मधु कुंभार, केंद्रप्रमुख प्रज्ञा राजळ, शाळेचे मुख्याध्यापक अनंत बांदेकर, शिक्षिका शिवप्रिया सावंत, सौ. नाईक, अंगणवाडी सेविका तसेच एकनाथ हडळणकर यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
