Headlines

सावंतवाडीत २३ जुलै रोजी अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र शिबिर…

आधार कार्ड व झेरॉक्ससह उपस्थित राहण्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांचे आवाहन..

⚡सावंतवाडी, ता. २१ -: सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संघाच्या वतीने अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र कार्यक्रम गुरुवार, दि. २३ जुलै रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत सावंतवाडी नगरपालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात पुणे येथील खाद्यपदार्थ तज्ज्ञ, अन्नपदार्थ सल्लागार व प्रशिक्षक अकुंश जोगदंड हे मार्गदर्शन करणार आहेत.
या प्रशिक्षणात किराणा दुकानदार, हॉटेल, खानावळ, बेकरी, मिठाई, कोल्ड्रिंक्स, फूड स्टॉल, मासे, चिकन, अंडी, मटण विक्रेते, दूध विक्रेते, चायनीज पदार्थ विक्रेते, फरसाण उत्पादक, भट्टी व्यावसायिक, वडापाव, समोसा, भजी, चहा विक्रेते, कॅटरिंग व्यावसायिक, विविध धान्यांपासून पीठ तयार करणारे तसेच पाणी बाटली व पाणी विक्री करणारे व्यावसायिक सहभागी होऊ शकतात.
शिबिरात सुरक्षित अन्न, अन्नसुरक्षा नियम, प्रमाणपत्र प्रक्रिया, आरोग्य संरक्षण आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संबंधित सर्व व्यापारी, उद्योजक व व्यावसायिकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. नोंदणीसाठी आधार कार्ड व त्याची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, असे आवाहन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page