Headlines

वजराट शाळेत पं. स. सदस्या सुचिता वजराटकर यांच्यामार्फत शैक्षणिक साहित्य वाटप

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील वजराट जि. प. शाळा नं. 1 मध्ये वेंगुर्ला तालुका शिवसेनेमार्फत तुळस पं. स. सदस्य सुचिता वजराटकर व वजराट सोसायटी व्हा.चेअरमन अण्णा वजराटकर
यांच्यामार्फत स्व : खर्चातून
विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी माजी शालेय शिक्षणमंत्री व आमदार दिपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वेंगुर्ला तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. यावेळी वेंगुर्ला शिवसेना तालुकाप्रमुख गुणाजी उर्फ बाळा दळवी, वजराट सरपंच अनन्या आनंद पुराणिक, माजी सरपंच सूर्यकांत परब, श्री देव गिरेश्वर सोसायटीचे माजी चेअरमन व तंटामुक्ती समिती अध्यक्ष बाबुराव परब, वजराट सोसायटी चेअरमन मनोहर परब, व्हा. चेअरमन दत्तात्रय वजराटकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेश परब, उपाध्यक्ष कृतिका परब, माजी सरपंच अनंत परब, मंगेश परब, मंगेश परब, भाजपा तालुका चिटणीस नितीन चव्हाण, सूर्यकांत परब, वामन भोसले, रसिका मेस्त्री, साईप्रसाद केरकर, प्रेमानंद भोसले, रवींद्र पालयेकर, बाळू परब, रोशन सपकाळ, दिलीप परब, आडेली वेतोरे संघटक मीतेश परब, संदिप पेडणेकर, ठुम्बरे, मुख्याध्यापक परब तसेच शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत वह्या वाटप करण्यात आले.

You cannot copy content of this page