कळणेतील युवतीचा गोव्यात मृत्यू…

एकजण जखमी:कामावरून परतताना कासारवर्णे येथे दोन दुचाकींचा अपघात..

⚡दोडामार्ग ता.०६-: धारगळ सुकेकुळण (गोवा) येथील अपघातात मातोंड, वेंगुर्ले येथील दुचाकीस्वार ठार झाल्याच्या घटनेला २४ तास उलटायच्या आत कासारवर्णे (ता.पेडणे) येथे झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात कळणे येथील सुजाता सातार्डेकर ( वय २५) हिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुसर्‍या दुचाकीचा चालक गंभीर जखमी झाला आहे.सुजाता मोपा विमानतळावर कामाला असते.तेथून ती घरी परतत असताना सकाळी ,८ च्या दरम्यान अपघात झाला.
मोपा विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फायझर मास्कारेन्हास हा दुचाकीने (जीए ११-जे-२१२८) हसापूर मार्गे जात असताना समोरून दुचाकीने (एम. एच. ०७-एटी-११५० ) येणार्‍या सुजाता सुरेश सातार्डेकर हिच्या दुचाकीची ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नांत त्याच्या दुचाकीला धडक झाली. हा अपघात बुधवारी (ता.६) सकाळी ८ च्या दरम्यान घडला. या अपघातात सुजाता जागीच ठार झाली. अपघातातील दुसर्‍या दुचाकीवरील स्वार फायझर फ्रान्सिस मास्कारेन्हास (वय २२ ) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताचा पंचनामा मोपा विमानतळ पोलिसांनी केला.

You cannot copy content of this page