अन्यथा आत्मदहन ; प्रशासनाला अमित परब यांचा इशारा..
⚡सावंतवाडी ता.०६-: आंबोली येथे अतिक्रमणावर महसूल व वन विभागाकडून झालेली कारवाई कौतुकास्पद आहे अशीच कारवाई आता आंबोली व चौकुळ येथे महाराष्ट्र शासन म्हणून नोंद असलेल्या जमिनीवरही झाली आहेत त्यावरही तत्परतेने व्हावी अशी मागणी आज भाजपा पदाधिकाऱ्यांकडून तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याजवळ निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान या निवेदनाची तात्काळ दखल न घेतल्यास आपण आत्मदहन करू असा इशारा देखील अमित परब यांनी यावेळी दिला आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले की आंबोली येथील वनखाते, खाजगी वने, वनसंज्ञा असलेल्या जमिनीवरील अनधिक्रुत बांधकामावर कारवाई करण्यात आली. वनसंज्ञा उल्लेख असलेल्या परंतु वहिवाट असलेल्या जमिनीवरील बंगल्यांवर कारवाई केलीत यासाठी आपण नक्कीच अभिनंदनास पात्र आहात. खाजगी वने, वनसंज्ञा जमिनीवर जवळजवळ शेकडो बांधकामे झालेली आहेत. याबाबतचे कायदेशीर पुरावे आम्ही आपल्या कार्यालयात येत्या दोन दिवसात सादर करू, आशा आहे की पुरावे दिल्यानंतर त्याच तत्परतेची कार्यवाही तुमच्याकडून अपेक्षित आहे असं देखील अमित परब यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
ते म्हणाले, आजच्या कारवाईत चार बंगल्यांचे ग्रामपंचायत आंबोली यांनी नंबरही दिले होते तरी देखील अगदी तत्परतेने ४८ तासात आपण कारवाई केली त्यासाठी आपले अभिनंदन.
त्याचबरोबर आंबोली, चौकूळ येथे आपल्या खात्याची नोंद असलेल्या म्हणजे वने, खाजगी वने, वनसंज्ञा जमिनीवर जवळजवळ शेकडो बांधकामे झालेली आहेत. याबाबतचे कायदेशीर पुरावे आम्ही आपल्या कार्यालयात येत्या दोन दिवसात सादर करू. पुरावे दिल्यानंतर त्याच तत्परतेची कार्यवाही तुमच्याकडून अपेक्षित आहे. ही बांधकामे पाडण्याअगोदर ज्या प्रकारे तुम्ही कोर्टाकडे कॅव्हेट दाखल केले तसेच यापुढेही जी कारवाई आपण आम्ही दिलेल्या पुराव्यावर करणार त्यावेळी असेच कॅव्हेट कोर्टात सादर करावे. म्हणजे आपल्या चांगल्या व प्रामाणिक हेतुबद्दल कुणाच्याही मनात शंका राहणार नाही असं मत देखील भाजनच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले.
यावेळी अमित परब,अजय सावंत,आनंद नेवगी, सुधिर आडीवरेकर केतन आजगावकर,विनोद सावंत, निशांत तोरसकर, प्रफुल गोंदावळे, क्लेटेस्ट फर्नांडिस, सचिन बिरजे, रफिक शेख, आदी उपस्थित होते.
