संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा भव्य बौद्ध धम्म परीषद…

मालवण ठिकाणी मामा वरेकर नाट्यगृह याठिकाणी करण्यात आले आयोजन..

⚡मालवण ता.०६-: डॉ. राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या दी बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सिंधुदुर्ग च्या वतीने संविधान दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त औचित्य साधून भव्य बौद्ध धम्म परिषदचे आयोजन मालवण या ठिकाणी 10 मार्च रोजी करण्यात आले आहे. सकाळीं 9.30 ते सायकाळी 5वाजेपर्यंत हे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी 5 ते 6 हजार बौद्ध धम्म बांधव यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या भव्य बौद्ध धम्म परिषदेला उपस्थित राहावे असे आवाहन आयु. चंद्रकांत जाधव जिल्हा संघटक. दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच हि बौद्ध धम्म परीषद होत आहे. त्यामुळें बौद्ध धम्म समाज बांधव यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page