मळेवाड-कोंडुरे गावचे माजी पोलिस पाटील दशरथ मुळीक यांचे निधन…

⚡बांदा ता.०५-: मळेवाड-कोंडुरे गावचे माजी पोलिस पाटील दशरथ शंकर मुळीक(वय 80) यांचे मंगळवारी दि.5 मार्च रोजी सकाळी राहत्या घरी निधन झाले. मुळीक यांचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान होते. आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळचे माजी सचिव म्हणून त्यांनी काही वर्षे कार्यकाळ सांभाळला. कोंडुरा येथे हायस्कूल सुरू करण्यास त्यांचा मोलाचा वाटा आहे.

क्रीडा, सामाजिक, आरोग्य क्षेत्रात त्यांनी बहुमोल असे कार्य केले. पोलिस पाटील असताना गावात महत्वपूर्ण काम केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, विवाहित मुली, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा परिषद माजी सदस्य राजन उर्फ राजू मुळीक यांचे ते काका होत.

You cannot copy content of this page